Eknath Shinde | Santosh Bangar
Eknath Shinde | Santosh BangarTeam Lokshahi

मुख्यमंत्र्यांनी बांगरांचा विषयावर बोलण्यास टाळले; म्हणाले, सोडा तो विषय...

राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयावर बोलण्यास टाळले आहे.
Published by :
Sagar Pradhan

शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे, वादग्रस्त कृतीमुळे कायम चर्चेत असतात. मात्र, आता काल ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे. माहितीनुसार, ठेकेदाराचे कॅन्टीन बिल पास न केल्याचा रागातून त्यांनी ही मारहाण केली. त्यावरून शिंदे गट मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.

Eknath Shinde | Santosh Bangar
बांगर यांनी केलेल्या मारहाणीनंतर केसरकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, अशा प्रकारं वर्तन...

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

काल शिंदे गट आमदार संतोष बांगर यांनी शासकीय कॉलेजच्या प्राचार्यला मारहाण केली. त्यानंतर विरोधकांकडून एकच शिंदे- फडणवीस सरकार आरोप केले जात होते. अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयावर बोलण्यास टाळले आहे. एका पत्रकाराने याबद्दल प्रश्न विचारला असता त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास टाळले आणि सोडा सोडा तो विषय असे म्हणून त्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com