Congress
CongressTeam Lokshahi

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, या दिग्ग्ज नेत्यांचा समावेश

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, अशोक गेहलोत, सचिन पायलट, भूपेंद्र सिंह हुडा, दिग्विजय सिंह, कमलनाथ, भूपेश बघेल, कांतीलाल भुरिया यांच्यासह एकूण ४० जणांचा समावेश आहे.

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश केला आहे. यासोबतच पक्षाने कमलनाथ, दिग्विजय सिंह, भूपिंदर सिंह हुड्डा आणि माजी मुख्यमंत्र्यांनाही आपल्या यादीत स्थान दिले आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत या नावांचा समावेश आहे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, रमेश चेन्निथला, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आणि कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तारिक अन्वर, बी.के. हरिप्रसाद, मोहन प्रकाश, शक्तीसिंह गोहिल, डॉ. रघु शर्मा, जगदीश ठाकोरी, सुखराम राठवा, सचिन पायलट, शिवाजीराव मोघे, भरतसिंह एम. सोळंकी, अर्जुन मोढवाडिया, सिद्धार्थ पटेल, अमित चावडा, नारनभाई राठवा, जिग्नेश खवेरा, इम्रान मेवाणी, प्रतापगढ़ी, कन्हैया कुमार, कांतीलाल भुरिया, नसीम खान, राजेश लिलोथिया, परेश धनानी, वीरेंद्र सिंह राठौर, सुश्री उषा नायडू, रामकिशन ओझा, बी.एम. संदीप, अनंत पटेल, अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि इंद्रविजयसिंह गोहिल.

दोन टप्प्यात मतदान असणार

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. ८ डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 182 आमदारांसह विद्यमान गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com