राजकारण
Congress | मुंबईत काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य
मुंबई काँग्रेस मध्ये नाराजी तीन माजी नगरसेवक यांचे राजीनामे
मुंबईत काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य पाहायला मिळत आहे. तीन माजी नगरसेवकांचे राजीनामे दिले आहेत. हे सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई काँग्रेसमधील माजी नगरसेविका पुष्पा कोळी, गंगा माने, बबु खान यांनी राजीनामा दिले आहेत. तर मुंबई काँग्रेस मधील पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनी पण राजीनामा दिला आहे.
आज दुपारी 3 वाजता ठाणे येथील आनंदाश्रम मठामध्ये हे सर्व काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.