Ashok Chavan | Prakash Ambedkar
Ashok Chavan | Prakash AmbedkarTeam Lokshahi

अशोक चव्हाणांचे आंबेडकरांसोबतच्या युतीबाबत मोठे विधान; म्हणाले, मी मागे प्रयत्न केले होते...

अजूनही आमच्याशी किंवा राष्ट्रवादीशी या विषयावर भाष्यं किंबहूना महाविकास आघाडीमध्ये अद्यापही चर्चा झाली नाही.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय गदारोळ सुरु असताना दुसरीकडे नुकताच शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती जाहीर झाली. या युतीमुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला. या युतीवर अनेक नेत्यांनी टीका देखील केली आहे. परंतु, महाविकास आघाडीसोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी आद्यपही भूमिका स्पष्ट केले नाही. यातच आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मोठे विधान केले आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी मी मागे प्रयत्न केले होते. असे ते म्हणाले आहे.

Ashok Chavan | Prakash Ambedkar
संत तुकाराम महाराजबद्दल केलेल्या विधान बागेश्वर बाबांनी घेतले मागे; म्हणाले, मी आपल्या परिने...

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना चव्हाण म्हणाले की, मागे मी प्रयत्न केला होता परंतु जमलं नाही. त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नाना यश येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांचं जे काही मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. महाविकास आघाडीबाबत त्यांची चर्चा उद्धव ठाकरेंसोबत झालेलीच आहे. शरद पवारांनी खुलासा केलाच आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी अद्याप या विषयावर काही भाष्य नाही. त्यामुळे ज्यावेळेस ते होईल, त्यावेळी ते समजायचं झालं म्हणून. अजूनही आमच्याशी किंवा राष्ट्रवादीशी या विषयावर भाष्यं किंबहूना महाविकास आघाडीमध्ये अद्यापही चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरेंशी त्यांचं बोलणं झालं असं मी ऐकतोय, पण आम्ही जे दोन घटकपक्ष महाविकास आघाडीचे आहोत, त्यांच्यासोबत अद्यापही कुठलीही संवाद या विषयावर झालेला नाही. असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com