Ashok Chavan
Ashok ChavanTeam Lokshahi

'याचा विनायक मेटे करा, याला ही मेटेंसारखे संपवा' अशोक चव्हाणांचे खळबळजनक विधान

लोकांची मने जिंकता येत नाहीत. म्हणून हा प्रकार सुरु आहे, हे दुर्दैव आहे.

कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना त्यांच्या लेटरहेडमधील मजकूर बदलणे, बनावट लेटरहेड बनवण्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. सोबतच याबाबत अशोक चव्हाण यांनी पोलिसांत देखील तक्रार केली आहे. त्यानंतर आता एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खळबळजनक विधान केले आहे. याचा विनायक मेटे करा, याला ही मेटेंसारखे संपवा, असे विधान त्यांनी केले आहे.

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले की, बोगस लेटरपॅडच्या अधारे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, परंतु, हे बोलताना त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. या प्रकरणा मागचा खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढले पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, काही लोकांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो याबाबत माहिती काढली जात आहे. याचा विनायक मेटे करा, याला ही मेटेंसारसारखे संपवा, अशीही चर्चा सुरू आहे, अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली. जे कोणी हे करता त्यांना हेच सांगायचं की, मला जीव गेला तरी हरकत नाही, पण अशोक चव्हाण तुमच्या सारख खोटे बोलून नेतृत्व करणारा नेता नाही. तुमच्यात नेतृत्व करण्याची चढाओढ चालू आहे, त्याबाबत आमची काहीही तक्रार नाही. तुमचे आम्ही नाव एकदाही घेत नाही. दुर्दैवाने माझ्यावर हा प्रसंग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांची मने जिंकता येत नाहीत. म्हणून हा प्रकार सुरु आहे, हे दुर्दैव आहे. असे देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com