Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

आम्ही एकमताने या सत्तेला थांबविण्यासाठी निर्णय घेतला, बैठकीनंतर पटोलेंचे विधान

काँग्रेस त्याठिकाणी अर्ज भरणार नाही. त्या व्यतिरिक्त तिथे जे अर्ज भरणार आहेत त्यांचंही एकमत केले जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.

राज्यात सध्या प्रचंड खलबत सुरु आहे. तर याच गोंधळा दरम्यान दुसरीकडे राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे या पाच जागेमध्ये नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत जागावाटप झाली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Nana Patole
भाजपमुळे नाही तर 'या' कारणामुळे शिवसेनेत बंडखोरी, गायकवाडांनी खोडले महाजनांचे वक्तव्य

काय म्हणाले नाना पटोले?

नागपूरच्या जागेसाठी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशी भूमिक मांडली होती. काँग्रेस त्याठिकाणी अर्ज भरणार नाही. त्या व्यतिरिक्त तिथे जे अर्ज भरणार आहेत त्यांचंही एकमत केले जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाई, अनेक प्रश्न आहे. जागा वाटप हा प्रश्न महत्त्वाचा नाहीय. आम्ही एकमताने या सत्तेला थांबविण्यासाठी निर्णय घेतला आहे. हुकूमशाहीने एकमताने लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही लढाई आहे. त्यासाठी आम्ही एक पाऊल मागे आलो आहोत. पाचही जागा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा प्रयत्न करु, असं नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com