Rahul Gandhi
Rahul Gandhi Team Lokshahi

हे मोदींचे सरकार नाही, तर अंबानी अदानींचे सरकार - राहुल गांधी

भाजपकडून नेहमी हिंदू धर्माबद्दल बोललं जातं, पण गरीबांना चिरडून टाका, असे हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे का?

काँग्रेसची सध्या कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरु आहे. हीच भारत जोडो यात्रा आज दिल्लीत पोहोचली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधकांवर भाषाणादरम्यान जोरदार निशाणा साधला. संपूर्ण देशाला माहित आहे की देशातलं हे सरकार नरेंद्र मोदींचे सरकार नाही, हे अंबानी अदानींचे सरकार आहे. असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Rahul Gandhi
निलंबनानंतर जयंत पाटील मतदारसंघात, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं की, देशात मोदींचं नाही तर अदानी अंबानींचं सरकार आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, संपूर्ण देशाला माहित आहे की देशातलं हे सरकार नरेंद्र मोदींचे सरकार नाही, हे अंबानी अदानींचे सरकार आहे. मी 2,800 किमी चाललो, मला कुठेही द्वेष किंवा हिंसाचार दिसला नाही, परंतु जेव्हा मी न्यूज चॅनेल उघडतो तेव्हा मला नेहमीच द्वेष-हिंसा दिसते, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, तप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. मी एक शब्दही बोललो नाही कारण मला त्यांच्याकडे किती शक्ती आहे हे पहायचे होते. भाजपकडून नेहमी हिंदू धर्माबद्दल बोललं जातं, पण गरीबांना चिरडून टाका, असे हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com