संजय राऊतांना राहुल गांधींचा फोन; म्हणाले, आम्हाला तुमची चिंता

संजय राऊतांना राहुल गांधींचा फोन; म्हणाले, आम्हाला तुमची चिंता

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात दाखल झाली आहे. परंतु, राहुल गांधी आज औरंगाबादेत असणार आहेत.

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात दाखल झाली आहे. परंतु, राहुल गांधी आज औरंगाबादेत असणार आहेत. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांना राहुल गांधींनी फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याची माहिती स्वतः संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊतांना राहुल गांधींचा फोन; म्हणाले, आम्हाला तुमची चिंता
शिवरायांचा अपमानाच्या पटकथेत भाजप सहभागी; शिवसेनेचा आरोप, माफी मागा नाहीतर...

पत्राचाळ घोटळ्याप्रकरणी संजय राऊत यांची सुटका झाल्यानंतर त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. या कारणास्तव राऊत भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संजय राऊतांची फोन करुन विचारपूस केली आहे.

याबाबत सांगताना संजय राऊत म्हणाले की, भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे ते म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दुःख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय, असे त्यांनी म्हंटले आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथे महाराष्ट्रातील समारोप झाला. यावेळी ते म्हणाले, ज्या महापुरुषांनी जनतेच्या मनात ही भावना टाकली तुमच्या रक्तात ही भावना रुजवली. त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो. त्यांच्या विना हा प्रदेश महाराष्ट्र नाही होऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे मी मनापासून आभार मानतो, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.

कन्याकुमारी ते काश्मीर जाणारी भारत जोडो यात्रेचा समारोप आज बुलढाणा जिल्ह्यांच्या जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथे झाला ही यात्रा निमखेडी ला 2 दिवसासाठी स्थगित करण्यात आली असून यात्रेचा पुढील टप्पा 23 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू होईल. महाराष्ट्रानंतर दोन दिवसांनी ही यात्रा सुरू होऊन मध्यप्रदेशाकडे रवाना होईल. तत्पुर्वी राहुल गांधी गुजरातला जाणार आहेत.

संजय राऊतांना राहुल गांधींचा फोन; म्हणाले, आम्हाला तुमची चिंता
नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरची ४८ वाहनांना धडक, ८ जण जखमी
Lokshahi Marathi
www.lokshahi.com