दुसऱ्यांचे चारित्र्यहानन करणाऱ्यांनी स्वतःचे चारित्र्य तपासावं; सचिन सावंतांचा सोमय्यांवर घणाघात
मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्यांवर टीकास्त्र सोडले आहे. दुसऱ्यांचे चारित्र्यहानन करणाऱ्यांनी स्वतःचे चारित्र्य तपासावं, असे त्यांनी म्हंटले आहे.
किरीट सोमय्या यांच्याकडे राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती म्हणून आम्ही पाहतो. सर्वांवर आरोप करतात, दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करतात, चारित्र्यहानन करत असतात. सुपारी घेतल्याप्रमाणे त्यांचे वर्तन असावं का अशी शंका येते. अशा पध्दतीचं वर्तन त्यांच्याकडून येत तर ते अधिक अधोरेखित होते. ही एक विकृत प्रवृत्ती आहे. हिसाब देना पडेगा, चारित्र्यशुध्द व्यक्तिमत्व आहे की नाही हे जनता ऑडिट करेल, असे सचिन सावंतांनी म्हंटले आहे.