Sonia Gandhi
Sonia GandhiTeam Lokshahi

सोनिया गांधींची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

प्रकृतीच्या तक्रारीनंतर त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृतीच्या तक्रारीनंतर त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Sonia Gandhi
ही काय धर्मशाळा आहे का? सभागृहात अजित पवारांचे रौद्ररूप

सर गंगाराम रुग्णालयाच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना रुग्णालयात सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या विविध चाचण्या सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितलं आहे. सोनिया गांधी यांना ताप आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी शुक्रवारी दिली आहे.

दरम्यान, याआधीही सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ५ जानेवारी रोजी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com