मी येतोय! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया

मी येतोय! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अंतरिम आदेशात राहुल गांधी यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्याला स्थगिती दिली.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अंतरिम आदेशात राहुल गांधी यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्याला स्थगिती दिली. या आदेशानंतर काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण आहे. तसेच, कॉंग्रेसने मी येतोय, असे ट्विट केले आहे.

मी येतोय! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया
... तर अख्खा कोकण देशद्रोही आहे का? आव्हाडांचा सरकारला सवाल

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रतिक्रिया दिली आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचे म्हणत सत्यमेव जयते कॉंग्रेसने म्हंटले आहे. तसेच, मी येतोय, प्रश्न सुरु राहतील, असा इशाराच मोदी सरकारला दिला आहे.

दरम्यान, मोदी आडनावाच्या मानहानीप्रकरणी शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यात आली आहे. या खटल्यात सर्वोच्च शिक्षा देण्यात आली होती. एवढी कठोर शिक्षा काय? हे न्यायाधीशांनी सांगायला हवं होतं, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हंटले आहे. या निर्णयामुळे आता राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार आहे. यासाठी त्यांना केवळ लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज करावा लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com