Nana Patole
Nana Patole Team Lokshahi

'एक आगळे वेगळे दर्शन महाराष्ट्राला जाहिरताबाजी करून बघायला मिळत आहे'- नाना पटोले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर नाना पटोलेंची जोरदार टीका.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. तर विरोधक देखील या दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे.

Nana Patole
'मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही' आयोध्येतून मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आगळ वेगळं दर्शन महाराष्ट्रच पाहायला मिळत कोट्यवधी लोक जातात पण अशी जाहिरात बाजी पाहायला मिळत नाही. धार्मिक पर्यटनाला जाण्यात काहीच गैर नाही, पण ज्या प्रमाणे जाहिरातबाजी सुरू आहे त्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे, एक आगळे वेगळे दर्शन महाराष्ट्राला जाहिरताबाजी करून बघायला मिळत आहे. जेंव्हा इतर कुणी जातात तेंव्हा अशी जाहिरताबाजी बघायला मिळत नाही, केवळ महाराष्ट्रातील लोकं जातात तेंव्हाच अशी जाहिरताबाजी पाहायला मिळते आहे. असा टोला त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com