Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

जेव्हा भाजपचे घर फुटेल तेव्हा....नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

सरकार पडणार की नाही यावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. कारण मी संविधान मानणार कार्यकर्ता आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्यातच या सर्व आरोप- प्रत्यारोपाचा सत्र सुरु असताना त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. सध्या भाजपमध्ये दुसऱ्याची घरे तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जेव्हा भाजपचे घर फुटेल तेव्हा भाजपला दुसऱ्याची घर फोडण्याचे दुःख कळणार. अशी टीका त्यांनी केली आहे.

Nana Patole
काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही नको, शिवसेनासोबतच्या युतीबाबत आंबेडकरांचे मोठे विधान

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या भाजपमध्ये दुसऱ्याची घरे तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जेव्हा भाजपचे घर फुटेल तेव्हा भाजपला दुसऱ्याची घर फोडण्याचे दुःख कळणार असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. आज देशात अनेक प्रश्न आहेत, मात्र त्याकडे भाजपकडून दुर्लक्ष केले जात आहे. बेरोजगारी, महागाई, बेकारी असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत असूनही भाजप मात्र मुख्य मुद्यांना बगल देत डावलत असल्याचा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितले की, सरकार पडणार की नाही यावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. कारण मी संविधान मानणार कार्यकर्ता आहे. भविष्य करणारे ते आहेत मी संविधानाच्या शेड्युल 10 नुसार जे नॉर्म अपात्रतेची असतात ते नॉर्म 16 आमदारांना लागू होतात. आणि त्या प्रमाणे निर्णय होईल म्हणून हे सरकार पडेल असे सांगतो. असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com