Congress
Congress Team Lokshahi

अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा? थोरातांनी स्पष्ट केली भूमिका

काल शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा शिवसेनेच्या उमेदवाराला अंधेरी पोटनिवडणुकीत पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते
Published by :
Sagar Pradhan

राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ घडल्यानंतर आता नवे शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आणि शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा पोटनिवडूक होत आहे. यासाठी पक्षांची जोरदार मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. त्यावरच आता काँग्रेसने देखील पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Congress
शिंदे सरकारचा मोठा निर्णय! गोरगरीबांना मिळणार दिवाळी भेट

काल शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने देखील भूमिकेबाबत मत मांडले आहे. बुलडाण्यात माध्यमांशी बोलत असताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना अंधेरी पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देतांना थोरात म्हणाले की, याबाबत आमचे पक्षश्रेष्ठी एकत्र बसून निर्णय घेतील, असे स्पष्ट सांगितले आहे.

Congress
एक कुटूंबाचा नाही बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा, शिंदे गटाचा तिसरा टीझर प्रदर्शित

थोरात म्हणाले की, अंधेरीच्या निवडणुकीत काँग्रेस म्हणून आम्ही एकत्रितच राहू. आमचे पक्षश्रेष्ठी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. हा निर्णय होईल तेव्हा आम्ही तो जाहीर करू, असे त्यांनी यावेळी सांगितले. हे सरकार कस बनले हे सर्वांना माहिती आहे. सर्वोच्च न्यायाल्याच्या निकालावर अवलंबून आहे की हे सरकार किती दिवस टिकेल, असा टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com