Jitendra Awhad
Jitendra AwhadTeam Lokshahi

आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचं बक्षीस; भाजपा पदाधिकाऱ्याची वादग्रस्त घोषणा, राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले. आव्हाडांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून आव्हाडांच्या या विधानाचा जोरदार निषेध नोंदवला आत आहे. अशातच, जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखाचे इनाम भाजप पदाधिकाऱ्याने जाहीर केले आहे. याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Jitendra Awhad
ज्या मुक्ता टिळकांची सध्या चर्चा होतीय त्यांचे लोकमान्य टिळकांशी नाते तुम्हाला माहिती आहे का?

जालन्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी भाजपा ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी. जो जीभ छाटेल १० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा यांनी केली. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. कपिल देहरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली असून त्याबाबतचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर पोलिस ठाण्यासमोर येऊन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com