राजकारण
'या' कारणामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित शहा यांचा ताफा जात असताना विरोधी घोषणा दिल्याने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. युवक काँग्रेसचे पुणे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्यासह सहा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
अमित शहा पुणे दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहा यांच्या विरोधात आंदोलन केले होते. राहुल शिरसाट, राजू ठोंबरे, स्वप्नील नाईक, अशितोष जाधवराव, अक्षय माने, योगेश यादव यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.