त्यांनी आता रिटायर्ड व्हावं; अत्यंत जवळच्या मित्राचा सल्ला शरद पवार ऐकणार का?
पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काका-पुतणे हे दोन्ही गट आपापली ताकद दाखवत आहेत. 82 वर्षांचा योध्दा म्हणत शरद पवारांनी सभांचा धडाका लावला आहे. तर याला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार उत्तर सभा घेत आहेत. अशातच, शरद पवारांच्या रिटायरमेंटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ते म्हणजे सायरस मिस्त्री यांच्यामुळे. शरद पवार यांचेच मित्र सायरस पूनावाला यांनी त्यांना रिटायरमेंटचा सल्ला दिला आहे.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांच्या रिटारमेंटबद्दल बोलले होते. वय 82, 83 झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं. तुम्ही आशीर्वाद द्या ना. चुकलं तर सांगा, असे अजित पवारांनी म्हंटले होते. यावर पलटवार करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सुनावले होते. रतन टाटा साहेबांपेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. पण ते आजही काम करतात. सायरस पूनावाला यांचे वय 84 आहे. अमिताभ बच्चन यांचे वय 82 आहे. प्रत्येक लोकप्रिय जाहिरात त्यांची आहे. वॉरन बफे, फारुख अब्दुल मोठे आहेत, असे उदाहरण सुप्रिया सुळेंनी दिले.
परंतु, आता सायरस पूनावाला यांनी शरद पवारांना रिटायरमेंटचा सल्ला दिल्याने सर्वांच्याच भुवयां उंचावल्या आहेत. शरद पवार यांना दोनदा पंतप्रधान व्हायची संधी मिळाली होती. पणं ती त्यांनी गमावली. पण आता त्यांनी आराम करावा. शरद पवारांनी आता रिटायर्ड व्हावं, असे पूनावाला यांनी म्हंटले आहे. तर, अत्यंत जवळच्या मित्राचा सल्ला शरद पवार ऐकणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.