जन्मदात्या शिवसेनेला बोगस म्हणणे म्हणजेच आईच्या दुधाशी गद्दारी, अंबादास दानवेंचा शिंदे गटावर प्रहार
शिवसेना आमदार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी दानवेंनी दसरा मेळाव्यावरून शिंदे गटावर जोरदार प्रहार केला.
अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेला बोगस म्हणणारेच आतापर्यंत शिवसेनेत होते. याच शिवसेनेने त्यांना मोठे केले. जन्मदात्या शिवसेनेला बोगस म्हणणे म्हणजेच आईच्या दुधाशी गद्दारी आहे, असे खडेबोल दसरा मेळाव्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला सुनावले.
पुढे ते म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातून पंधरा ते 20 हजार कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी नेणार असे मंत्री संजय राठोड म्हणाले होते, त्याच्या वरही बोलताना दानवेंनी खरपूस समाचार यांनी घेतला. किती गाड्या लावायच्या लावा, किती कार्यकर्ते जातात ते बघूच, यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते शिवसेनेसोबत आहेत, असा विश्वास यावेळी दानवेंनी व्यक्त केला.