Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

'गद्दारांना खाली पाडून आपल्या सोबत खुद्दार आले' फडणवीसांचा घणाघात

बेकायदेशीर आहे, ते बेकायदेशीर आहे, मी सांगतो आपण जे केलं आहे ते नियमात आहे, कायद्यात आहे.
Published by :
Sagar Pradhan

नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. आगामी निवडणुकांसाठी भाजपने मिशन 200 ची घोषणा केली. सोबतच या कार्यकारणीत कार्यकारिणीत महत्वाचे निर्णय झाले असून आगामी निवडणुकांसाठी मेगा प्लॅनिंग ठरला आहे. भाजपने याच भूमीत 'शत-प्रतिशत'चा नारा दिला होता. आजच्या याच कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले फडणवीस?

आपण दिलेल्या नाऱ्यामुळे महाराष्ट्रात पहिला पक्ष भाजप आहे हे आपण दाखवून दिलं आहे. मला काय मिळणार हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत सोडून द्या. पदे मिळतील पदे मिळणार नाहीत. पण सध्या काम करा. त्यानंतर जनता आपल्याला पुन्हा एकदा संधी देईल. मागील अडीच वर्ष महाराष्ट्राचे वाया गेले. अडीच वर्ष मागच्या सरकारमध्ये घरं भरण्याचे कामं केले. मात्र, आता जनतेचे सरकार आहे. आम्ही आता 20-20 ची बॅटिंग सुरू झाली आहे आणि ही बॅटिंग 2024 सालीही दिसेल. अशी तुफान फटकेबाजी केली.

पुढे ते म्हणाले की, आपण जे केले ते नियमाने आणि कायद्याने केले आहे. पण ते म्हणतात की हे सरकार आता पडेल मग पडेल. मात्र हे सराकर पडणार नाही. त्यांना वाटतं कायदा त्यांनाच कळतो. मात्र, कायदा आम्हालाही कळतो. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेलच. आज जे महाराष्ट्रात सरकार आलंय, ते गद्दारांचं सरकार नसून खुद्दारांचं सरकार आहे. हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे, ज्यांची विचारांसाठी खुद्दारी आहे असं हे सरकार आहे. गद्दारांना खाली पाडून आपल्या सोबत खुद्दार आले आणि आपण महाराष्ट्रात नवं सरकार उभं केलं. म्हणून खुद्दार आपल्या सोबत आहेत. शिवसेनेच्या उरलेसुरल्यांना थांबवण्यासाठी सर्व सुरू आहे. हे बेकायदेशीर आहे, ते बेकायदेशीर आहे, मी सांगतो आपण जे केलं आहे ते नियमात आहे, कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल, हे मी ठासून सांगतो, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com