Yashomati thakur : आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

Yashomati thakur : आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

आमदार यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी
Published by  :
Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

आमदार यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. असेच बोलत असाल तर दाभोळकर करू. दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस टराटरा फाडून जन्नत मध्ये पाठवला. असे म्हणत यशोमती ठाकूर यांना धमकी देण्यात आली आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. आमदार यशोमती ठाकूर या देखील या मुद्द्यावर बोलताना दिसल्या. त्यांनी अमरावतीत रस्त्यावर उतरत आंदोलनही केलं. त्याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

या धमकी प्रकणावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मला मारायचं असेल तर मारा पण संभाजी भिडे यांच्या वक्तव्याला मी विरोध करत राहणार. तुम्हाला काय करायचंय ते करा. पण माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला गृहखातं जबाबदार असेल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com