Abu Azami
Abu Azami Team Lokshahi

'त्या' विधानामुळे सपा नेते अबू आसिम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

बू असीम आझमी यांनी औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल ही धमकी आल्याचे कळत आहेत.

समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अबू आझमी यांचा स्वीय सहाय्यक यांना फोनद्व्यारे शिवीगाळ केली गेली. त्यानंतर आझमी यांना त्या अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. मुघल शासक औरंगजेबबाबत सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गोंधळाचे वातावरण आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल ही धमकी आल्याचे कळत आहेत.

धमकीनतंर आझमी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणी मुंबईतल्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कुलाबा पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी कलम 506(2) आणि 504 लावून गुन्हा दाखल केला आहे. अबू आझमी यांना धमकी नेमकी कुणी दिली याचा शोध पोलीस घेत आहेत.

काय म्हणाले होते आझमी?

औरंगजेब वाईट राजा नव्हता, त्याचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय. औरंगजेबाचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. औरंगाबादमध्ये अनेकांची नावं औरंगजेब आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद, औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांची नावं मुस्लिम असल्याचंही अबू आझमी म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com