Nitin Gadkari
Nitin Gadkari Team Lokshahi

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तब्बल तीनवेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे.
Published by :
Sagar Pradhan

नागपुरातून आज एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांना फोनद्वारे या धमक्या मिळाल्या आहे. नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तब्बल तीनवेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशताद्यांकडून हल्ल्याचा कट असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nitin Gadkari
नाशिक पदवीधर निवडणुकीचा पेच वाढला, ठाकरे गटाचा या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

पहिला कॉल आज सकाळी 11.28 मिनिटांच्या सुमारास आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा जनसंपर्क कार्यालयात पोहोचला असून पुढील तपास सुरु आहे. या धमक्या मिळाल्यानंतर नितीन गडकरी यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 14 जानेवारी रोजी सकाळी तीन वेळा गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात धमकीचे फोन आले. त्यामुळे नागपूर पोलीस अलर्ट झाली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com