दीपक केसरकर भाजपला नकोत? मंत्री म्हणाले, कपटी मित्रापेक्षा...

दीपक केसरकर भाजपला नकोत? मंत्री म्हणाले, कपटी मित्रापेक्षा...

दीपक केसरकरांनी लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : आमदार म्हणून दीपक केसरकर भाजपला नको आहेत, असे भाजपचे काही नेते म्हणत आहे. यावर दीपक केसरकरांनी लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून प्रतिक्रिया दिली आहे. भाजपवर मी कधीही टीका केली नाही आणि पुढे सुद्धा करणार नाही, असे केसरकर यांनी म्हंटले आहे.

दीपक केसरकर भाजपला नकोत? मंत्री म्हणाले, कपटी मित्रापेक्षा...
Video : आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी झाली; आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

ते मित्र आहेत आपल्याला माहिती आहे. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चालतो? मी त्यांना काही बोलणार नाही. परंतु, सोनाराने कान टोचावे लागतात. त्याच्यामुळे श्रेष्ठ त्यांचे कान टोचतील असतील. शैक्षणिक पालकमंत्री त्यांचे श्रेष्ठ आहेत. पालकमंत्री स्टेजवर असताना असं वक्तव्य करताना पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने कोणाचे हिम्मत होणार नाही. जे काम झाले ते कोणी केली हा प्रश्न आहे. ज्या ज्या गोष्टी नव्हता त्या प्रत्येक गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हायेस्ट निधी मिळाला आहे. भाजपवर मी कधीही टीका केली नाही आणि पुढे सुद्धा करणार नाही, असेही केसरकर यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com