अजित पवारांची इच्छा लवकरचं पूर्ण होणार, दादांचं सगळं आम्ही ऐकतो : केसरकर
प्रसाद| सिंधुदुर्ग : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला असून, अजूनही अनेक जणांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. यावरुन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला होता. यावर आज शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांची इच्छा लवकरचं पूर्ण होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच पूर्ण होणार आहे. अजित दादांचं सगळं आम्ही ऐकतो. त्यामुळे अजित दादांच्या सुचनेच पालन होईल, असा सुचोवात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केलं.
सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाला भाजप संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जातं आहे. यावर बोलताना काहीतरी गैरसमज झालेला आहे. एकत्र बसून आपण हे सगळं मिटवू. मुंबईची जबाबदारी मला दिली आहे त्यामुळे आमच्या मूळ शिवसेना ही बाळासाहेबांची मूळ शिवसेना आहे. कोकणात शिवसेना नेहमी आघाडीवर राहील, असे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.
कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक सुरू करणार. शाहू पुलावर पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करणार. जयपूर चं स्थान भारताच्या नकाशावर आहे तस कोल्हापूरचं स्थान निर्माण करून जगासमोर नेऊन वैभव प्राप्त करून दिल जाईल.
रत्न सिंधू योजनेसाठी आठवड्यातून तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देणार असून या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्याचा कायापालट होईल, असेही केसरकरांनी यावेळी सांगितले.