दिल्लीच्या राजकारणात खळबळ! उपमुख्यमंत्र्यासह आरोग्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला राजीनामा
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत सध्या राजकीय खळबळ माजली आहे. केजरीवाल सरकारमधील दोन मंत्र्यांनी आज राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्ली सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात एकच गदारोळ निर्माण झाला आहे.
कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दोन दिवसांपूर्वी चौकशी अंती अटक करण्यात आली होती. तर सत्येंद्र जैन हे अनेक महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहेत. सिसोदिया यांच्या अटकेवरून गोंधळ सुरु असताना वादात सापडलेल्या या दोन मंत्र्यांचे राजनीमे आता मुख्यमंत्री अरविंद स्वीकारले आहेत. त्यामुळे आता दिल्ली सरकारमध्ये हे मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
सिसोदिया तब्बल अठरा मंत्रालयाचे कारभार पाहत होते
विशेष म्हणजे, मनीष सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, वित्त, नियोजन, जमीन आणि इमारत, सेवा, पर्यटन, कला-संस्कृती आणि भाषा, जागरुकता, श्रम आणि रोजगार, सार्वजनिक बांधकाम विभाग याशिवाय आरोग्य, उद्योग, वीज, गृह, नगरविकास, पाटबंधारे आदी विभाग आहेत. पूर नियंत्रण आणि जल विभाग अशी एकूण 18 मंत्रालये त्यांच्याकडे होती.