Manish SIsodia
Manish SIsodiaTeam Lokshahi

मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना आता मनीष सिसोदिया यांना अटक.

देशाची राजधानीतून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्यावर कथित दारू घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. परंतु, त्यांच्यावर ह्या झालेल्या कारवाईमुळे दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु होती. त्यातच आज सकाळपासून चौकशी सुरु होती. त्यानंतर आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com