...तर होऊनच जाऊ द्या दूध का दूध अन् पाणी का पाणी : अजित पवार

...तर होऊनच जाऊ द्या दूध का दूध अन् पाणी का पाणी : अजित पवार

वेदांताप्रकरणी अजित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई : वेदांता प्रकल्पावरुन राजकारण सुरुच असून महाविकास आघाडीमुळेच प्रकल्प राज्यातून गेल्याचा आरोप सातत्याने शिंदे सरकारकडून करण्यात येत आहे. याला आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीमुळे वेदांता गेला असे जर कोणाला असं वाटत असेल तर त्यांनी केंद्र आणि राज्याकडे चौकशीची मागणी करावी. होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी, असे खुले आव्हान त्यांनी शिंदे सरकारला दिले आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

वेदांता प्रकल्पाप्रकरणी बरीच चर्चा झाली. आता मुख्यमंत्री दोन दिवसांसाठी दिल्लीला जात आहेत. इतर राज्याच्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी ते जात असतील, असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावावं. त्यांना काहींनी चुकीची माहिती दिली आहे. काही जणांनी आरोप केले की काहींनी मागणी केली म्हणून हा प्रकल्प गेला, असा सूचक प्रश्न त्यांनी विचारला आहे.

महाविकास आघाडीमुळे वेदांता गेला असे जर कोणाला असं वाटत असेल तर त्यांनी केंद्र आणि राज्याकडे चौकशीची मागणी करावी. चौकशी करु द्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, असेही त्यांनी म्हंटले आहे. असं कुठलं प्रकरण घडलं नाही. जुलैला ऑर्डर आली म्हणजे तेव्हा आमच सरकार नव्हत. आजच्या निमित्ताने मला सांगायचं आहे की काही जण अफवा उठवत आहेत. परंतु, आमच्या काळात वेदांत बाहेर पाडलं नव्हत. तळेगावची जागा त्यांना योग्य वाटली होती. महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनीच ही जागा निवडली होती. महाराष्ट्र राज्याच्या हिताचे जे प्रश्न असतील ते यावेत. मात्र, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवार म्हणाले, आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे तो थांबायला तयार नाही. शिंदे साहेब यांनी दौरे केले, मदत करतो, असं बोलले. पण, अजूनही पैसे मिळालेले नाही. आज 20 सप्टेंबर तारीख असून अद्यापही पैसे मिळालेले नाही. सरकारने सूचना दिल्या पाहिजेत. अधिक पाऊस पडल्यास जी काही मदत दिली आहे. त्यालाच अनुसरून पुढच्या मदती दिल्या पाहिजे. मी आग्रहापूर्वक मागणी करतो की यामध्ये तातडीने लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी शिंदे सरकारकडे केली आहे.

दसरा मेळाव्याच्या वादाबाबत अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रयत्न करावा. उच्च न्यायालयामध्ये जाऊन पण परवानग्या घेतल्या पाहिजेत. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांनी तिथेचं सभा घेतली आहे. बाळासाहेब यांनीच उद्धव ठाकरे यांना सांभाळा असं आव्हान केलं होते. शिंदे गटाला बीकेसीची जागा उपलब्ध करून दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मिळावं, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com