राजकारण
Ajit Pawar : अजित पवार यांचे अमित शाहांना पत्र; कारण काय?
अजित पवार यांनी अमित शाहांना पत्र लिहिलं आहे.
केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. असे त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी अमित शाहांना पत्र लिहिलं आहे. इथेनॉल बंदीसंदर्भात अजित पवार यांनी हे पत्र लिहिलं आहे. इथेनॉल बंदी निर्णयाचा पुनर्विचार करण्याची अजित पवार यांनी मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे. इथेनॉल निर्मीतीवर बंदी आल्यास उद्योग अडचणीत येतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
इथेनॉल निर्मितीवर बंदी आल्यास हा उद्योग अडचणीत येईल. इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांची करोडो रुपयांची केली आहे. या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.