राजकारण
अखेर अजितदादांची 'पवारांच्या' दिवाळीत हजेरी; सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबाचा पहिलाच दिवाळी पाडवा गोविंदबागेत पार पडला.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबाचा पहिलाच दिवाळी पाडवा गोविंदबागेत पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार का याची सर्वांनाच उत्सुकता होती. अजित पवारांनी या कार्यक्रमाला भेट दिली नसल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, संध्याकाळी या कार्यक्रमात अजित पवार सहभागी झाले. त्यामुळे दिवसभर सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अजित पवार दिसत आहेत. शरद पवारांच्या मागे अजित पवार उभे असलेले दिसून येत आहे.
अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जेवणासाठी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते मात्र तेव्हा अजित पवार दिसून आले नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.