Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

राज्यात लवकरच बंपर पोलिस भरती, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

पोलीस दलात नोकरी मिळण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना शिंदे- फडणवीस सरकारकडून मोठी संधी

राज्यात नव्या शिंदे- फडणवीस सरकारने नुकताच मोठ्या पोलिस भरतीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्याच्या पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांना दिवाळीत आनंदाची बातमी दिली आहे. येत्या आठ दिवसांत 18 हजार पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis
दिपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी, ठाकरे गटाला धडकी

राज्यात लवकरच पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेची जाहिरात काढणार असल्याची माहिती दिली आहे. तब्बल 18 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची ही भरती असणार असून दिवाळीनंतर या संबंधी जाहिरात प्रसिध्द केली जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हंटले आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पोलीस भरती झाली नव्हती. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांमध्ये प्रचंड नाराजी होती. कोरोना काळात देखील पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्णतः बंदच होती. त्यानंतर मविआ सरकारने पोलीस भरती करू असे जाहीर केले होते, मात्र अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे पोलीस भरती कधी होणार ? किती जागांसाठी ही पोलीस भरती असेल अशा अनेक चर्चा होत्या. आता शिंदे- फडणवीस सरकारने संपवली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com