Ambadas Danve vs Devendra Fadnavis
Ambadas Danve vs Devendra Fadnavis

Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतर शहराचं की जिल्ह्याचे? दानवेंच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर

उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) तर उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विटद्वारे सरकारला सवाल केला. दानवे यांच्या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, औरंगाबादचे नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर असे असणार आहे.

Ambadas Danve vs Devendra Fadnavis
Kasba Byelection : Ravindra Dhangekar आज कसबा गणपती मंदिराबाहेर उपोषणाला बसणार

दानवे यांनी उपस्थिती केलेला सवाल?

हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. ता. 'छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद', असे यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगावे. असे ट्वीट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे.

Ambadas Danve vs Devendra Fadnavis
Amravati Accident : ट्रॉली उलटून 22 महाविद्यालयीन‎ विद्यार्थी जखमी; दाेघांची प्रकृती गंभीर‎

दानवेंच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर

अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण झाले आहे.त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही! असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांनी अंबादास दानवे यांच्या प्रश्नावर उत्तर देत नामांतराची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com