Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर, राजकीय चर्चांना उधाण

आमदार टिळक यांचे अंतिम दर्शन घेऊन फडणवीस हे नागपूरला येणे अपेक्षित होते. मात्र, ते पुण्याहून थेट तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आता नागपूरमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र, याच अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस हे आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज (ता. २३ डिसेंबर) पुण्यात आले होते. परंतु, परत नागपूरला न जात ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

Devendra Fadnavis
मनसेचं पोट्टच तुमच्यावर वरवंटा फिरविणार : राज ठाकरे

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याहून थेट तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस हे आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज पुण्यात आले होते. त्यांच्यासोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रवीण दरेकर व इतर भाजप नेते होते. आमदार टिळक यांचे अंतिम दर्शन घेऊन फडणवीस हे नागपूरला येणे अपेक्षित होते. मात्र, ते पुण्याहून थेट तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com