...तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील अन् ते चोर बोलतील; सभागृहात फडणवीस आक्रमक

...तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील अन् ते चोर बोलतील; सभागृहात फडणवीस आक्रमक

संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन अधिवेशनात एकच गदारोळ

मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन आज अधिवेशनात एकच गदारोळ झाला असून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. संजय राऊतांवर हक्कभंगाचा आणण्याची मागणी सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आला आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. या वक्तव्याचा निषेधही आपण करणार नसू तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील. आणि ते रोज येऊन आपल्याला चोर बोलतील, असे त्यांनी म्हंटले आहे.

...तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील अन् ते चोर बोलतील; सभागृहात फडणवीस आक्रमक
संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं विधिमंडळात भाजपा-शिंदे गट आक्रमक; हक्कभंग आणण्याची मागणी

संजय राऊत हे बोलले ते मी देखील ऐकलं आहे. चोर म्हणण्यापेक्षा काम न केलेलं बरं होईल. कोणी कोणाला देशद्रोही ही बोलू नये. हा आरोप केवळ सत्तापक्षावर नाही. हे सहन करण्यासारखं नाही आहे. ज्या विधानमंडाळाच्या संदर्भात देशभरात चर्चा आहे. त्याबद्दल असे बोलणे निषेधार्थ आहे. हे एका पक्षाने केलेलं नाही. वेळोवेळी आपल्या भूमिका पार पाडल्या. हक्कभंग हे यासाठी केलं जाते की या वक्तव्याचे समर्थन केलं जाऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हंटले आहे.

कोणी गाय मारली म्हणून वासरू मरावं हे योग्य नाही. उद्धव ठाकरे हे देखील या विधानमंडळाचे सदस्य आहेत. तेही चोर मंडळाचे सदस्य ठरतात. राऊत फक्त चोर मंडळ नाही तर गुंडामंडळ पण ते बोलले. एका मोठ्या सभागृहाच्या नेते असं बोलत असतील तर कसं सहन करायचे. मी कोणताही निर्णय घेणार नाही. पण, जर निषेधही आपण करणार नसू तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील. आणि ते रोज येऊन आपल्याला चोर बोलतील. मनासारखे झाले म्हणून रोज विधीमंडळाचा अपमान करतील. मी काहीच मागणी सरकार म्हणून करत नाही. पण, विधीमंडळाचा अपमान सहन करणार नाही, हा संकेत देणे गरजेचे आहे.

आमच्या पक्षाचा असता तर विधानमंडळाने अशा प्रकारे अपमान खपवून घेणार नाही. माझी विनंती आहे की मी वैयक्तिक या वक्ताव्याचा निषेध करतो. यावर काय कारवाई करणार याकडे जनता पाहत आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com