संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं विधिमंडळात भाजपा-शिंदे गट आक्रमक;  हक्कभंग आणण्याची मागणी
Admin

संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं विधिमंडळात भाजपा-शिंदे गट आक्रमक; हक्कभंग आणण्याची मागणी

विधीमंडळ हे चोरमंडळ आहे असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात केलं.

विधीमंडळ हे चोरमंडळ आहे असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात केलं. संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. त्यांनी पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली पदं परत येतील. असे राऊत म्हणाले.

यावरुन आता विधिमंडळात भाजपा-शिंदे गट चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्तावही आणण्यात आला आहे. यावर थोरात यांनी म्हटले आहे की, विधिमंडळाला चोर मंडळ आहे हे म्हणणे चुकीचे आहे. शब्दाचा वापर सर्वांनी राखून केला पाहिजे. तसेच अजित पवार म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला अशा पद्धतीने चोर मंडळ म्हणायचा अधिकार नाही. याची शहानिशा करायला हवी. जर ती व्यक्ती तसे बोललेली असली तर त्यांना व्यवस्थित मेसेज देण्याचे काम केले पाहिजे. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com