devendra fadnavis vs uddhav thackeray
devendra fadnavis vs uddhav thackerayTeam Lokshahi

त्यांच्या पूज्यपिताजीला पण घाबरलो नाही; फडणवीसांचे उध्दव ठाकरेंवर घणाघात

हिवाळी अधिवेशानाचे आज सूप वाजले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.

नागपूर : हिवाळी अधिवेशानाचे आज सूप वाजले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. त्यांच्या पूज्य पिताजीला पण आम्ही घाबरलो नाही. त्यांच्या नाकाखालून 50 लोक निघून आले, असा जोरदार घणाघात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला आहे.

devendra fadnavis vs uddhav thackeray
काही लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण... : एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्याकडे नागपूरमध्ये एक म्हण आहे नाखून कटाके शहीद बनना, अशा प्रकारचा हा विषय आहे. त्यांच्या पूज्य पिताजीला पण आम्ही घाबरलो नाही. त्यांच्या नाकाखालून 50 लोक निघून आले. मुंबईला आग लागेल अस म्हंटल होते. पण, साधी माचीसची एक काडी पण पेटली नाही, अशा शब्दात त्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.

इंद्रजींसारख्या अतिशय पावरफुल असलेल्या नेतेदेखील निवडणुकीमध्ये हरलेले आपण बघितलेले आहेत आणि 2014 सुप्रिया सुळे देखील बराच काळ मागे होते आणि शेवटी कमी मताने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळेंनी त्या ठिकाणी लक्ष ठेवू नये आणि मिशन बारामती आहेच. पण, केवळ मिशन बारामती नाही मिशन महाराष्ट्र आहे. ते मिशन महाराष्ट्रामध्ये बावनकुळे बारामतीमध्ये गेल्यामुळे अजित पवार यांना फार राग आलेला दिसतो आहे. पण, आम्ही त्यांना समजावून सांगू की असं नाही आम्ही सगळीकडे जातोय, असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

devendra fadnavis vs uddhav thackeray
मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, मुलाच्या वयाच्या...

दरम्यान, या ठिकाणी विरोधी पक्षाला पूर्णपणे उघडे पडले मग महापुरुषांचा विषय असो किंवा राजकीय कुठे कारवायांचा विषय असो किंवा इंडस्ट्रीचा विषय असो सिंचनाचा विषय असो प्रत्येक विषयातली योग्य आकडेवारी मांडून हे सरकार कसं प्रभावीपणे काम करताय हे विरोधकांना आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला हे त्यांनी लक्षात आणून दिले. लोकशाहीची हत्या होते आहे अशी लोकशाहीची दुहाई देणारे या अख्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये केवळ 46 मिनिटं होते, अशीही टीका फडणवीसांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com