फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना टोला; सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मेलेले...

फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना टोला; सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मेलेले...

देवेंद्र फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अमोल धर्माधिकारी | पुणे : पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन तसेच घर चलो संपर्क अभियानचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपण स्थगिती सरकार घालवल आणि गतिशील सरकार आणलं, असे टीकास्त्रही त्यांनी उध्दव ठाकरेंवर सोडले आहे.

फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना टोला; सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मेलेले...
मोठी बातमी! राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये? फडणवीसांचे संकेत

महाविकास आघाडी सरकार वसुली सरकार होतं. कोरोनाच्या काळात प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याची प्रवृत्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाहायला मिळाली. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला. आम्ही त्यांच्या विरोधात न घाबरता संघर्ष केला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मेलेले आम्ही नाही. आम्ही संघर्ष करणारे आहोत, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

एकेकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते. ते जगात कुठेही गेले की आले कधी गेले कधी कळत नव्हतं. फोटोतही ते दिसत नव्हते. आज जगात पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय पटलावर जागा मिळवली आहे. कुठेही गेले की इतर देशाचे प्रमुख त्यांना भेटण्यासाठी प्रतीक्षेत असतात. जगात मंदी असताना भारतावर मंदीचे संकट नाही हे काम मोदींनी केलं. आपला देश जगात सर्वात वेगानं प्रगती करणारा देश बनला आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

2014 च्या निवडणुकीनंतर त्यावेळच्या शिवसेनेने खुर्चीसाठी विचार सोडला. मुख्यमंत्री होण्यासाठी अभद्र युती केली. ते सरकार घालवणं आवश्यक होतं. खरे शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे आपल्यासोबत आले आणि आपण आपलं सरकार बनवलं. आपण स्थगिती सरकार घालवल आणि गतिशील सरकार आणलं, असे टीकाही फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

कर्नाटकमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही. निवडणुकीत कधी विजय होतो. कधी पराभव होत असतो. खरे पाहता आपल्या मतांची टक्केवारी केवल 0.4 टक्क्यांनी कमी झाली. येत्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील 28 पैकी 25 जागा भाजपला मिळतील हे लिहून ठेवा. कर्नाटकातील निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही. महापालिका असो, विधानसभा, लोकसभा सगळीकडे आपलीच सत्ता येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पहिली लढाई मनपाची ऑक्टोबर नोव्हेंबर माहित नाही, असे संकेतही फडणवीसांनी दिले आहेत.

कर्नाटकातील निकालांनंतर काही जणांची अवस्था बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कर्नाटकात अर्धा टक्केही मतं मिळाली नाहीत. दुसऱ्याच्या घरात मूल झालं तरच ते पेढे वाटतात, असा निशाणाही फडणवीसांनी राष्ट्रवादीवर साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com