जुनी पेन्शन योजनेबाबत फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं, कर्मचाऱ्यांनी...

जुनी पेन्शन योजनेबाबत फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं, कर्मचाऱ्यांनी...

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरुन राज्यभरात कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून राजकारण तापले आहे

मुंबई : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरुन राज्यभरात कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून राजकारण तापले आहे. यावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जुनी पेन्शन योजना लागू केली तरी काही फरक पडणार नाही. कारण याची खरा परिणाम 2030 नंतर दिसून येणार आहे. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जावू शकतो. कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

जुनी पेन्शन योजनेबाबत फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं, कर्मचाऱ्यांनी...
कांद्याचा मुद्दा संसदेत मांडणार; शरद पवारांची माहिती, शिंदे-फडणवीसांवर साधला निशाणा

आज आपल्या सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली तरी काही फरक पडणार नाही. कारण याची खरा परिणाम 2030 नंतर दिसून येणार आहे. प्रश्न एवढाच आहे एक राज्यकर्ता म्हणून प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नाचा लॉन्गटर्म विचार करायचा की आपले सरकारची दुसरी निवडणूक जिंकायची म्हणून तयार करायचे. राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करायला हवा, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

अर्थतज्ज्ञ अहुवालियांनी जुन्या स्किमकडे जाणे हे डिजास्टरकडे जाण्यासारखे असल्याचं म्हटलं आहे. ज्या राज्यातील सरकारने जुनी पेन्शन योजना स्वीकारली तेथे आर्थिक बोजा वाढणार आहे. यावर चर्चा करायला व्हावी. मी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा करण्यास तयार आहे. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जावू शकतो. कर्मचाऱ्यांनी संप करू नये, तसेच विरोधकांनीही या गोष्टीचे राजकारण करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com