राज्यात राजकीय घडामोडींना वेग! फडणवीसांची अजित पवारांसोबत बैठक, राज ठाकरे अन् शिंदेंनाही भेटले

राज्यात राजकीय घडामोडींना वेग! फडणवीसांची अजित पवारांसोबत बैठक, राज ठाकरे अन् शिंदेंनाही भेटले

राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात आज बैठक झाली. आणि यानंतर काहीच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली. तर, लगेचच फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग! फडणवीसांची अजित पवारांसोबत बैठक, राज ठाकरे अन् शिंदेंनाही भेटले
तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आगामी हिवाळी अधिवेशनाआधी बैठक झाली होती. 2022 च्या पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयकावर दिलेल्या आश्वासनानुसार या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. महाविकास आघाडीचा 17 डिसेंबर रोजी महामोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज महत्वपूर्ण बैठक पार पडत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com