Devendra Fadnavis
Devendra FadnavisTeam Lokshahi

फडणवीस संतापले; म्हणाले, नागपुरात भाजप नेत्यांची अवस्था कॉंग्रेसप्रमाणे होत चाललीये

आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

कल्पना नळसकर | नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. विशेषतः आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. फडणवीसांनी नागपुरातील नेत्यांची चांगलीच कानउघाडणी या बैठकीत केली.

Devendra Fadnavis
मुख्यमंत्री शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी जेवणासाठी 3 महिन्यात तब्बल 2.38 कोटी खर्च

नागपूरात कॉंग्रेसच्या नेत्यांप्रमाणे भाजपचे नेते होत चालले आहेत. लक्षात ठेवा, पक्ष आहे म्हणून आपण आहोत. त्यामुळं आता जोमानं निवडणुकीच्या तयारीला लागा. आपल्याला राज्यात १५० जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या स्वतःच्या १५० जागा निवडून आणायच्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेनेच्या आणखी जागा निवडून येतील. पण, आपल्याला आपल्या १५० जागा निवडून आणायच्या आहेत. आपल्याला २०-२०च्या मॅचसारखं काम करायचं आहे. येत्या काळात पाच वर्षांची निवडणुकीची कामं करायची आहेत, असा निर्धार फडणवीस यांनी नागपूर शहर भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत व्यक्त केला.

१५० विधानसभा जागांचं टार्गेट म्हणजेच भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल, असा निर्धार ठेवून भाजप कामाला लागली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर, आता नागपूर भाजप जोमानं आगामी निवडणुकीच्या तयारीला लागली. यात महानगरपालिका निवडणूक आणि त्यानंतर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आज नागपूर शहर भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.

या बैठकीत भाजपचं संघटन मजबूत करणे, केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामं मतदारांपर्यंत पोहोचवणे आणि मतदारांशी संपर्क वाढवणे, यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यकारिणी बैठकीचं उद्घाटन केलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी समारोपीय कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com