ललित पाटील प्रकरणात तोंड बंद झालीयं, उरलेलीही लवकर होतील : फडणवीस
पुणे : ललित पाटील प्रकरणातील गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. कोणी प्रोटेक्शन दिलं होतं हे सुद्धा समोर आलं आहे. आता विरोधकांना बोलायला जागा नाही. ललित पाटील प्रकरणात तर तोंड बंद झालेलीच आहे. उरलेली ही लवकर होतील, असा निशाणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर साधला आहे.
पुण्यातल्या येरवडा जेलच्या कैद्यांना पोलिसांच्या आशीर्वादानं वस्तूंचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलाय. एका निर्जनस्थळी पोलिसांची व्हॅन थांबवून कैद्यांना वस्तू पुरवल्या जात असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सुषमा अंधारेंनी ट्विट करत पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर अशी जोरदार टीका केली. यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही तक्रार केली असेल किंवा व्हिडिओ ट्विट केला असेल ती सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, ललित पाटील प्रकरणात थोडे अजून वाट पहा. या प्रकरणात वरवरची कारवाई करून काही होणार नाही याचा मूळ शोधून काढण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे की मराठा आरक्षण देण्याची कमिटमेंट आहे, त्यावर जी कार्यवाही करायची आहे ती आम्ही करत आहोत. त्याला जेवढा कायदेशीर वेळ द्यावा लागेल तेवढा मी देऊ. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला सांगितला आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे राज्यकर्ते म्हणून आमचं कर्तव्य आहे. ही आमचीच नाही तर सर्वांची जबाबदारी आहे की राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये ही जबाबदारी आहे, ते समाजाचे असो की राजकीय नेते, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.