राजकारण
होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, कारण... : फडणवीस
नाना पटोलेंच्या वक्तव्याचा समाचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमातून घेतला आहे.
शिर्डी : दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर लक्ष ठेवून आहेत, असं विधान नाना पटोले यांनी केलं होतं. या वक्तव्याचा समाचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमातून घेतला आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज शिर्डीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राज्यात मजबूत सरकार आहे. तरीही काही लोक दिवसा स्वप्न पाहताहेत. काही लोक म्हणताहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर नजर आहे. होय, आमची नजर आहे पण त्यांना आधार देण्यासाठी आहे. होय, मी पुन्हा येईल म्हणालो होतो. मात्र काही जणांनी गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्षच घेऊन आलो, असा निशाणा त्यांनी विरोधकांवर साधला आहे.