तुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून मारली आम्ही मुसंडी; फडणवीसांचे आठवले स्टाईल अजित पवारांना उत्तर

तुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून मारली आम्ही मुसंडी; फडणवीसांचे आठवले स्टाईल अजित पवारांना उत्तर

अर्थसंकल्पावर अजित पवारांची टीका; देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

मुंबई : विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. काही योजनांसाठी ‘पुरेशी तरतूद’ असा उल्लेख म्हणजे नेमके काय ते स्पष्ट करावं, असे अजित पवारांनी विचारले आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. तुम्ही परखड त्यामुळे आवश्यक तरतूद शब्द वापरता, मी जरा सौम्य, म्हणून पुरेशी तरतूद शब्द वापरतो, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

तुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून मारली आम्ही मुसंडी; फडणवीसांचे आठवले स्टाईल अजित पवारांना उत्तर
राज्यपालांचे 'तो' निर्णय ठाकरे सरकार पाडण्याचं पाऊल; सुप्रीम कोर्टाचे कोश्यारींच्या भूमिकेवर ताशेरे

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की विरोधकांना कोणतेही आरोप करण्यासाठी जागा राहिली नाही. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, आरोग्य, रस्ते अशा सर्व क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्व क्षेत्र आणि सर्व घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प आहे. तुमचे किमान समान कार्यक्रमाचे आश्वासन आता आठवतात तरी का? किती आश्वासने महाविकास आघाडीने दिली आणि ती हवेत कशी विरली, याची यादीच माझ्याकडे आहे आणि ती जनतेला सुद्धा ठावूक आहे. अजित पवार म्हणाले, कढी बोलाचीच भात। जेऊनिया कोण तृप्त झाला॥ पण हे महाविकास आघाडीच्या संदर्भात होते. आमच्या सरकारसंदर्भात ते असे आहे, आजि देतो पोटभरी। पुरें म्हणाल तोवरि, अशा अभंगातून फडणवीसांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

तुमच्या काळात सर्वात मोठा पक्ष असलेल्या तत्कालिन शिवसेनेला 4,35,691 कोटी रुपयांपैकी केवळ 15 टक्के निधी दिला होता. आता तो 34% आहे. तुम्ही त्यांची कोंडी केली म्हणून तर हा दिवस आला. रामदास आठवलेंच्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून मारली आम्ही मुसंडी. तिघाडीची झाली आघाडी, तीन-तीन हायकमांड आहेत. देशी-विदेशी झाले कालबाह्य, बदलत्या काळाच्या, बदलत्या डिमांड आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा दिला, तर तुम्हाला पोटात का दुखते? तुमच्या काळात शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसेच मिळाले नाही. पीकविम्याची स्थिती काय होती? पीकविमा कंपन्यांच्या घशात सर्वाधिक निधी गेला तो महाविकास आघाडीच्या काळात. जुनी पेन्शन योजना बंद झाली त्यावेळी त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यात सरकार होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख तर अर्थमंत्री जयंत पाटील होते. मला दोष द्यायचा नाही. निर्णय विचारपूर्वकच घेतला असेल. आज आम्ही निर्णय घेतला तरी आमच्यावर बोझा नाही. पण राज्य म्हणून विचार करावाच लागेल. आम्ही विरोधात नाही. पण विचार करून निर्णय घ्यावा लागेल. आम्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही. आता 3 सदस्यीय समिती आपण गठीत केली आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे म्हणाले? इत्र सें कपडो को महकाना कोई बडी बात नही, मजा तो तब है, जब आपके किरदार से खुशबू आए. मी त्यांना एवढेच सांगतो. दुआ करो कि सलामत रहे मेरी हिंमत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है मगर, ठहरा नही हूँ मैं. मंजिलों से कह दो अभी पहुँचा नही हूँ मैं, असे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com