Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Team Lokshahi

अडीच वर्ष मला संपवायचा प्रयत्न केला, परंतु...; फडणवीसांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या टिकेला देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

सध्या महाराष्ट्रात एक वेगळच राजकारण सुरूअसताना या राजकारणामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. ह्या सगळ्या वादानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी बुधवारी मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी अनेक विरोधी पक्षांवर टीका केली. या भाषणात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मात्र या टिकेला आज देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले फडणवीस ?

काल उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी माझ्यावर टीका केली, ज्यावेळी आमच्या सोबत असताना तुम्ही मोदींचा फोटो लावून 2019 ची निवडणूक जिंकलात. त्यानंतर तूम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला मग त्यावेळी तुम्ही का राजीनामा दिला नाहीत? इतकीच हिंमत होती तर त्यावेळीच राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत जायचं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंचं कालचं जे भाषण होतं ते निराशेचं भाषण होतं.

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Shivsena Dasara Melava 2022: उच्च न्यायालयाने शिवसेनेची मागणी केली मान्य

उद्धव ठाकरे असंही म्हणाले की देवेंद्र फडणविसांची ही शेवटची निवडणूक आहे. तुम्ही अडीच वर्ष कॉंग्रेस सोबत राहून मला संपवायचा प्रयत्न केला. परंतू, तुम्ही मला तेव्हाही संपवू शकले नाही आणि यापुढे ही संपवू शकणार नाही. तीन पक्षांनी मिळून मला हरवण्याचा प्रयत्न केला तरीही मी जिंकलो आणि पुन्हा आलो असं वक्तव्य करत असताना त्यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे.

आता उद्धव ठाकरे गटाकडून काय उत्तर दिले जाणार ही पाहणे गरजेचे आहे.

Lokshahi
www.lokshahi.com