घटकपक्षांना मंत्रिमंडळात मिळणार स्थान; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

घटकपक्षांना मंत्रिमंडळात मिळणार स्थान; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Devendra Fadnavis : नवीन सरकारने आज अतिशय महत्वाचे निर्णय घेतले.

मुंबई : मुख्यमंत्री आणि मी आता ठरवलं शिवसंग्रामसोबत जितके घटक पक्ष आहेत. त्यांना संधी देण्याचं काम आम्ही करणार असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळाबाबत सूचक वक्तव्य केले आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या वाढदिवसानिमित्त आणि केलेल्या कार्याबद्दल अभिष्टचिंतन सोहळा मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पार पडत आहे. यावेळी ते बोलत होते.

घटकपक्षांना मंत्रिमंडळात मिळणार स्थान; फडणवीसांचं सूचक वक्तव्य
'एकनाथ शिंदे यांचा आदर, पण आमच्या मनात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री'

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनायक मेटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळाच्या शुभेच्छा देतो. गेले 20 वर्ष मी त्यांना पाहत आहे. त्यांचं वय वाढतच नाहीच आहे. त्यांच्यातली ही ऊर्जा समाजाच्या प्रति भावना अशीच कायम राहिलं पाहिजे.

नवीन सरकारने आज अतिशय महत्वाचे निर्णय घेतले. औरंगाबाद शहराला आता छत्रपती संभाजी नगर असं नाव असेल. काही लोकांना वाटतं नामांतर करणे म्हणजे धर्मांच्या विरोधात बोलणं. परंतु, जगाच्या पाठीवर कोणीच गुलामीच्या पाऊलखुणा कोणाला सोडत नाही. आक्रमाणाच्या पाऊलखुणा पुसायच काम कायम चालू असतं. जे लोकं याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे, अशी अप्रत्यक्ष टीकाही एआयएमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावर फडणवीसांनी केली आहे.

घटकपक्षांना मंत्रिमंडळात मिळणार स्थान; फडणवीसांचं सूचक वक्तव्य
Eknath Khadse : नामांतराबाबत शिंदेंचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री आणि मी आता ठरवलं शिवसंग्रामसोबत जितके घटक पक्ष आहेत. त्यांना संधी देण्याचं काम आम्ही करू, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विनायक मेटे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

जे सरकारच्या हातात होतं ते देखील त्यांनी केलं नाही. एक मंत्रिमंडळ उपसमिती होती ती नेमकी काय करायची माहित नाही. तत्कालीन मुख्यमंत्री हे वेळ द्यायचे की नाही माहित नाही. आम्ही कोणीही खुर्च्या तोडण्यासाठी आलेलो नाही, सत्ता आमचं साधन आहे आणि परिवर्तन घडवायचे आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com