Dhananjay Munde: "घड्याळ आणि वेळ दोन्हीही दादांचीच!"

Dhananjay Munde: "घड्याळ आणि वेळ दोन्हीही दादांचीच!"

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळाला आहे. दरम्यान अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीही एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

यावर धनंजय मुंडे या सर्व राजकीय घडामोडीबाबत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हणाले की, घड्याळ आणि वेळ दोन्हीही दादांचीच! निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत! या निकालातून आज आमचा निर्णय योग्यच होता हे पुन्हा एकदा नियतीने सिद्ध केले. पक्षातील सर्व मान्यवर नेत्यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन. 'हा विजय लोकशाहीचा'.

या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com