...तर रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत स्वतः करेल; धनंजय मुंडेंचं पंकजांना चॅलेंज

...तर रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत स्वतः करेल; धनंजय मुंडेंचं पंकजांना चॅलेंज

विविध विकास कामाचा मुद्दावरून मुंडे भाऊ-बहिणींमध्ये शाब्दिक युद्ध

विकास माने | बीड : परळी विधानसभा मतदारसंघात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरून मुंडे भाऊ-बहिणींमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिशनांर्गत कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुंडे बहिणींवर टीका केली आहे. तर, यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना आव्हानही दिले आहे.

...तर रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत स्वतः करेल; धनंजय मुंडेंचं पंकजांना चॅलेंज
उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; मालेगावात आज जाहीर सभा

परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगावरून खासदार प्रीतम मुंडे यांना टोला लगावला. काशी विश्वनाथाचं जेवढं महत्त्व आहे तेवढेच महत्त्व परळीच्या प्रभु वैद्यनाथाचे देखील आहे. खासदारांना हे माहित हवं होतं.

तर शिरसाळा येथील एमआयडीसी वरून बहिण पंकजांवर देखील धनंजय मुंडे यांनी टीका केली. मी आणलेल्या एमआयडीसीत एक उद्योग आणून दाखवा, मी स्वतः रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत करेल, असं आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजांना दिले आहे. 2009 ची विधानसभा निवडणुक मला लढवून दिली असती तर आज मतदारसंघ पंधरा वर्षे पुढे विकासात गेला असता, असे देखील धनंजय मुंडे म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com