Draupadi Murmu
Draupadi MurmuTeam Lokshahi

द्रोपदी मुर्मू विजयी, भारताच्या नव्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास...
Published by :
Shubham Tate

Draupadi Murmu : राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आघाडीवर होत्या. आणि आता त्यांना विजयी घोषीत करणयात आले आहे. दरम्यान, भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू याच भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. द्रोपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांच्यावरती सहज विजय प्राप्त केला आहे. आत्ताच राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल हाती आला आहे, सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतभेटीत 18 तारखेला बंद चालू होतं. आज त्याचा निकाल लागलेला आहे.(Draupadi Murmu won, the country got a new president)

Draupadi Murmu
द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती : वाचा, बैदापोसी गाव ते रायसोनी हिल्सपर्यंतचा प्रवास

द्रौपदी मुर्म देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती

आज देशाला 15 वे राष्ट्रपती (President) मिळाले असून पहिल्या महिला द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आता देशाच्या 15 व्या राष्ट्रपदी झाल्या आहेत. ओडिशा ते दिल्ली व्हाया बिहार असा त्यांचा प्रवास आहे. या देशाने आतापर्यंत 14 राष्ट्रपती पाहिलेत. मात्र, पहिल्या महिला राष्ट्रपतीचा मान मुर्मू यांना मिळाला आहे.

पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कारकीर्द संपणार असून येत्या 21 तारखेला देशामध्ये नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आता द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

Draupadi Murmu
Praful Patel | ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी; प्रफुल पटेल यांच्यावर मोठी कारवाई

द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास...

द्रौपदी यांचा जन्म ओडिशातील मयूरगंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात संथाल आदिवासी समाजात झाला. त्यांचे लहानपण गरिबी व संघर्षात गेले. 1997 मध्ये भाजपसोबत त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर राजकीय जीवनातील एक-एक शिडी पार करत 2000 मध्ये भाजप-बीजद सरकारमध्ये मंत्री झाल्या. त्यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु पराभूत झाल्या. 2015 मध्ये बिहारचा राज्यपाल झाल्या. आता 2022 मध्ये देशाच्या राष्ट्रपती होत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com