Karun Munde
Karun Munde Team Lokshahi

बीडमध्ये दसरा मेळावा वाद पेटणार, करुणा शर्मा घेणार भगवान गडावर मेळावा

मी देखील भगवान गडावर दसरा मेळावा घेणार- करुणा शर्मा

राज्यात एकीकडे राजकीय खळबळ सुरु असताना, शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळवावरून वादंग सुरु असताना आता बीड जिल्ह्यात सुद्धा दसरा मेळावा गाजणार असे चिन्हे दिसत आहे. पंकजा मुंडे ह्या दरवर्षी प्रमाणे दसरा मेळावा घेत असतात. पण आता करुणा शर्मा यांनी देखील भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. यामुळे आता राज्यात दोन्ही दसऱ्या मेळाव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Karun Munde
मनसेमध्ये इनकमींग होणार? राज ठाकरेंचं सुचक वक्तव्य...

मुलाचा वाढदिवसा दिनी घेणार मेळावा

पुणे दौऱ्यावर असताना करुणा शर्मा म्हणाल्या की, मी देखील वंजारी समाजाची सून असल्याने आणि मुंडेच्या एकुलत्या एक वंशाचा दसऱ्याच्या दिवशी वाढदिवस असल्याने मी देखील भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून भगवान गडावर दसरा मेळावा होत नाहीये. मेळाव्याची परंपरा खंडित झाली आहे ती परंपरा यंदा परत सुरू करणार असल्याचं यावेळी करुणा शर्मा यांनी जाहीर केलं आहे.

कुठे केले करुणा शर्मा यांनी हे विधान ?

पुण्यातील घोरपडी पेठ परिसरामध्ये लहुजी शक्ती सेना व कैलासवासी रेखा सातपुते यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या रक्तदान शिबिरासाठी करुणा शर्मा उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.

Lokshahi
www.lokshahi.com