भारतात जूननंतर आर्थिक मंदी? केंद्रीय मंत्र्यांंचे मोठे विधान

भारतात जूननंतर आर्थिक मंदी? केंद्रीय मंत्र्यांंचे मोठे विधान

नारायण राणे यांनी आर्थिक मंदी बद्दल मोठे विधान केले. जी २० परिषद निमित्त माध्यमांशी संवाद साधत होते.

पुणे : पुण्यात जी २० परिषदेचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान राणे यांनी आर्थिक मंदीबद्दल मोठे विधान केले आहे. भारतात आर्थिक मंदी जूननंतर अपेक्षित आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये मंदी आहे. भारतात आर्थिक मंदी जूननंतर अपेक्षित आहे. पण, त्याची झळ सामान्य नागरिकांना बसून यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

भारतात जूननंतर आर्थिक मंदी? केंद्रीय मंत्र्यांंचे मोठे विधान
नाकासमोरून पळवलेले उद्योग आधी घेऊन या; राऊतांची मुख्यमंत्र्यावर टीका

जी २० परिषद याला आज सुरुवात झाली आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की ही जी २० ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे उद्घाटन माझ्या हाताने झाले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धनयवाद देतो. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करतो आहोत. अमेरिका, चायना, जपान, जर्मनी यानंतर भारत ५व्या नंबरवर येण्याच्या प्रयत्नात आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर मला अभिमान आहे कारण ते जे बोलतात ते पूर्ण करतात.

जगातील शहरातील विकास कसा होईल याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत. शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषद मधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करेल. महाराष्ट्र प्रशासन बद्दल मला अभिमान आहे. आपण आपल्या नेत्यांच्या कुठल्या ही पक्षाच्या बौद्धिक गोष्टींना कमी लेखू शकत नाही. सरकार बदलले निर्णय बदलतात या गोष्टीला मी सहमत नाही. मी ३२ वर्ष कुठल्या न कुठल्या खात्याचा मंत्री होतो. निर्णय बदलत नाहीत दृष्टिकोन बदलतो. जी २० पोस्टर वर कमळ आहे. कमळ हे भाजप च नाही भारताचे आहे. भाजप म्हणून जरी घेतले तरी माझी हरकत नाही. जो भाजप मध्ये येईल त्याचा शाश्वत विकास होईल, असेही नारायणा राणे यांनी म्हंटले आहे.

उद्योग बाहेर जात नाहीत. हे राजकारण आहे वास्तव नाही. उद्योग बाहेर जातात या चुकीच्या बातम्या नाहीत. पण, मिस गाईड करणाऱ्या बातम्या आहेत. जे राज्य कर सवलत देईल त्यानंतर बाहेरच्या कंपनी तिथे येऊन गुंतवणूक करतात. देशाच्या इतर भागापेक्षा जागेचे दर महाराष्ट्रात महाग आहेत. उद्योग बाहेर जातात. पण, परत महाराष्ट्रात परत येतात. माझ्या जवळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रीपद आहे. उद्योग महाराष्ट्रात येण्याकरीता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. रोजगार देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. २०० कोटीचा ट्रेनिंग प्रोग्राम पुण्यात येईल.

अमेरिकेचा जीडीपी २० ट्रिलियन आहे. भारत ५ पर्यंत पोहचू पाहतो आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक स्थिती भारताची सुधारावी याचा परिणाम सर्व सामान्यांना होतो. हा जी २० परिषद चा सामान्य लोकांना फायदा आहे. नागरिकांच्या उत्पन्नावरून जीडीपी ठरवला जातो. भारत ८० कोटी लोकांना अन्न मोफत देत आहोत. त्यामुळे जी २० चा लाभ सर्वसामान्यांसाठी आहे. जी २० मध्ये पर्यावरण हा विषय देखील घेतला आहे.

गुंतवणूक आपल्याकडे येण्यासाठी सुरक्षितता दिली जाईल. जी २० आणि नेत्यांच्या वक्तव्याचा काही संबंध नाही. चॉईस उद्योजकांचा असतो. सुलभ मूलभूत सुविधा कुठे मिळतील त्याबद्दल गुंतवणूकदार चर्चा करतात. जगामध्ये आर्थिक मंदी मोठ्या देशांमध्ये आहे. भारताला त्याची झळ येऊ नये आणि मंदी आली तर जून नंतर येईल. मंदीची झळ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com