iqbal singh chahal
iqbal singh chahalTeam Lokshahi

100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीची नोटीस

100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर आलेली असताना, कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे. कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. ईडीने चहल यांना येत्या सोमवारी 16 जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

iqbal singh chahal
Hockey World Cup पहिल्याच सामन्यात स्पेनचा पराभव करत भारताची विजयी सुरुवात

कोरोना काळात बीएमसीकडून कोव्हीड सेंटर मध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. आणि यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त झाले. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप करत यामध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी 2022 मध्ये तक्रार केली आणि यासंदर्भात ऑगस्ट 2022 मध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com